शेतकऱ्यांसाठी खुशखबर नियमित कर्ज-फेड शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान कोणाला मिळणार लाभ?

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत अशी महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांचींची कर्जमुक्ती करण्यासाठी राज्य सरकारने कर्जमुक्ती योजनेसाठी 700 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे याचा लाभ त्याच शेतकऱ्यांना भेटेल चे नियमित कर्ज पेड करत आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत या कर्जमाफीची घोषणा केली आहे शेवटी या योजनेसाठी 700 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात  आहे

राज्याच्या तिजोरीवर पडणार 4 हजार 700 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार karj mafi news
नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपया पर्यंतचे प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून 700 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळं 4 हजार 700 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. याआधी 2 हजार 900 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर आता 700 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

14 लाख शेतकऱ्यांना लाभ


राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय जुलैमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. सुमारे 14 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि 6 हजार कोटी निधी लागेल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 13.85 लाख शेतकऱ्यांच्या 14.57 लाख कर्जखात्यांसाठी अंदाजे 5 हजार 722 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. या योजनेचा लाभ 2019 मध्ये राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा घेता येईल. एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्ज परतफेड केली असल्यास त्या वारसाला सुद्धा हा लाभ मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.

कोणाला मिळणार लाभ?


नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी 2017-18, 2018-19 आणि 2019-20 हा कालावधी विचारात घेतला आहे. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. 2018-19 मध्ये अतिवृष्टीग्रस्त ज्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई दिली आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील लाखों शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. याशिवाय या योजनेत 2017-18, 2018-19, 2019-20 या कालावधीत बँक किंवा संस्थांकडून घेतलेले कर्ज पात्र आहे.

कुणाला किती अनुदान? ज्या शेतकऱ्याने ५० हजार किंवा त्याच्या वर १ लाख किंवा त्याही पेक्षा ज्यास्त कर्ज घेतले आहे व गेल्या तीन वर्षांत त्याने पीक कर्ज ठरवून दिलेल्या कालावधीत भरले आहे. त्याला ५० हजार रुपये दिले जातील. ज्या शेतकऱ्यांचे पन्नास हजारांच्या आत कर्ज आहे त्यांना कर्ज इतकी रक्कम दिली जाणार आहे

Leave a comment