राज्यात ‘या’ 4 जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी

राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. पावसाअभावी शेतीची कामं खोळंबली होती. अखेर राज्याच्या अनेक भागामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.तर रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.मुंबईसह ठाण्यातही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

पुण्यासह पालघर, सातारा आणि रायगडमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या चारही जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर आज मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Leave a comment